Last Updated: Thursday, January 17, 2013, 11:29
www.24taas.com,लंडनदक्षिम मध्य लंडनमध्ये एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरील क्रेनवर टक्कर लागल्याने हेलिकॉप्टर कोसळले. त्यानंतर हेलिकॉप्टरने पेट घेतला. यावेळी आगीचे तांडव पाहायला मिळाले. या अपघातात वैमानिकाचा मृत्यू झाला तर १३ जण जखमी झालेत.
क्रेनला धडक बसल्यानंतर हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळले आणि त्यानंतर त्याने पेट घेतला. यावेळी मोठा स्फोटाचा आवाज झाला. या दुर्घटनेत कोणी जखणी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, येथील वाहतूक रोखण्यात आली आहे. काही मेट्रो स्टेशन बंद करण्यात आली होती. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. यात वैमानिक आणि एका मजूराचा समावेश आहे.
पोलिसांनी सांगितले की, या दुर्घटनेचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, कोणीही पोलीस अधिकारी अधिक माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही.
लंडनमधील अग्नीशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एका क्रेनला धडक लागल्याने हेलिकॉप्टर कोसळले, असे फोन आलेत. त्यानंतर ही माहिती मिळाली. काही प्रत्यक्षदर्शीने माहिती दिली की, हेलिकॉप्टर इमारतीचा काही भाग कोसळल्यानंतर जमिनीवर कोसळले. तर इमारतीवरील क्रेन लोंबकळत होती.
First Published: Wednesday, January 16, 2013, 14:52