Last Updated: Thursday, October 17, 2013, 15:53
www.24taas.com , वृत्तसंस्था, लंडनअमेरिकेच्या माजी प्रथम महिला आणि परराष्ट्रसचिव हिलरी क्लिंटन यांना अमेरिकेच्या भावी राष्ट्राध्यक्ष म्हणून पाहिले जाते; मात्र ही बाब लंडनमधील वाहतूक पोलीस अधिकार्यारवर कोणताही प्रभाव करू शकलेली नाही. पार्किंगसाठी तिकीट न घेता कार उभी केल्याबद्दल हिलरींना १३० डॉलरचा दंड ठोठावला गेला.
वेस्टमिनिस्टर शहर परिषदेचे सदस्य डॅनियल अस्टायर यांनी सांगितले की, अमेरिकेच्या मुत्सद्दी मोहिमेत एका नव्या युगाला चालना देण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल हिलरींना चॅथम थिंक टँकचा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी हिलरी मागील आठवड्यात लंडनला गेल्या होत्या; मात्र आयोजकांनी त्यांच्या कारसाठी पार्किंग तिकीट घेतले नव्हते.
हिलरी यांनी मध्य लंडनमधील सेंट जेम्स चौकात कार उभी केली होती. या ठिकाणी कार उभी करण्यासाठी ३.३0 युरोचे तिकीट घ्यावे लागते. हिलरी यांची मर्सिडीज कार पार्किंग तिकिटाशिवाय ४५ मिनिटे उभी होती. त्याबद्दल त्यांना १३० डॉलरचा दंड आकारण्यात आला आहे. सर्वांबाबत समान दृष्टिकोन बाळगण्याची आमची भूमिका त्या समजून घेतील याची मला खात्री आहे, असेही अस्टायर म्हणाले.
दरम्यान, पाहुण्या हिलरी यांना लंडनच्या वाहतुक शाखेने सवलतही जाहीर केली आहे. जर त्यांनी १४ दिवसांत दंड भरला तर त्यांचा निम्मा दंड माफ होणार आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, October 17, 2013, 15:53