पतीचे विवाहबाह्य संबंध : हिनाचा आत्महत्येचा प्रयत्न , Hina attempted suicide over husband’s infidelity

पतीचे विवाहबाह्य संबंध : हिनाचा आत्महत्येचा प्रयत्न

पतीचे विवाहबाह्य संबंध : हिनाचा आत्महत्येचा प्रयत्न
www.24taas.com, ढाका
बांग्लादेशी वर्तमानपत्र ‘ब्लिज’नं हिना रब्बानी-खार आणि बिलावल भुट्टो यांच्या प्रेमाच्या चर्चांवर एक नवाच खुलासा केलाय. या बांग्लादेशी टॅब्लॉईडच्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या परदेश मंत्री हिना रब्बानी यांनी पती फिरोज गुलजार यांनी केलेल्या विश्वासघातानंतर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. जीव देण्यासाठी त्यांनी झोपेच्या गोळ्यांचं सेवन केलं होतं, पण त्या सुदैवानं त्या प्रसंगातून वाचल्या.

दोन वर्षांपूर्वीच हिना रब्बानी यांना त्यांच्या पतीच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती मिळाली होती. पती फिरोजचे त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका युवतीशी विवाहबाह्य संबंध असल्याचं माहित पडल्यानंतर हिना मानसिकरित्या पूर्णत: कोसळल्या होत्या. यानंतर या दोघांच्या संबंधांत दुराव्याची सुरुवात झाली. पण, हिनाला पतीच्या या संबंधाबद्दल काही ठोस पुरावे मात्र हाती लागले नाहीत. त्यांनी याबद्दल त्यांच्या वडीलांनाही कळवलं होतं. याच काळात हिनानं एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असं ‘ब्लिज’नं म्हटलंय. यानंतरच बिलावल आणि हिना यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाल्याचा दावा या वर्तमानपत्रानं केलाय. फिरोज आणि हिनाला दोन मुली आहेत. ३४ वर्षीय हिना रब्बानी-खार एक बिझनेसवुमन आहेत तसंच पाकिस्तानातल्या एका शाही आणि नावाजलेल्या परिवारातील ही मुलगी आहे.

हिना आणि बिलावल प्रेम संबंधाची खबर कळल्यानंतर फिरोजनं त्यांच्यावर पाळत ठेवणं सुरू केलंय. परदेश मंत्री पद सांभाळताना हिना रब्बानी जेव्हा जेव्हा बिलावलसोबत परदेश दौऱ्यावर जात तेव्हा तेव्हा या अविश्वासाला आणखी जोर मिळत असे. पण, ही गोष्ट फिरोज गुलजार यांना मान्य नव्हती. त्यांनी यासाठी हिनाला विरोधदेखील केला होता, असाही खुलासा या वर्तमानपत्रानं केलाय. यामुळेच गेल्या काही दिवसांपासून बिलावल भुट्टो आणि हिना रब्बानी-खार यांच्या प्रेमसंबंधांच्या बातम्यांना आणखीन जोर मिळाला.

First Published: Thursday, September 27, 2012, 21:45


comments powered by Disqus