Last Updated: Saturday, August 11, 2012, 14:45
www.24taas.com, इस्लामाबादपाकिस्तानमध्ये दोन दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या हिंदू मुलीने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. मुस्लीम युवकाशी लग्न केल्याचे वृत्त पाकिस्तानी प्रसार माध्यमांनी दिले आहे. दरम्यान, मुलीचे बळजबरीने धर्मांतर केले आहे, असा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे.
दोन दिवसांपूर्वी हिंदू मुलीचे अपहरण करण्यात आले होते. त्यामुळे खळबळ माजली होती. मात्र, अपहरूत मुलीचे धर्मांतर झाल्याचे सांगण्यात येत आहे. मनीषा कुमारीने दूरध्वनी करून आपल्या पालकांना धर्मांतर केल्याची माहिती दिली. तिचे नाव आता महविश ठेवण्यात आले आहे.
घुलाम मुस्तफा छन्ना याच्यासोबत लग्न करण्यासाठी इस्लाम स्वीकारला असल्याचे तिने सांगितले आहे. दरम्यान, तिच्या वडिलांनी आरोप केला आहे की, बळजबरीने तिला इस्लाम स्वीकारावा लागला आहे. त्यानंतर तिचे लग्न लावले आहे. ती कधीही हिंदू धर्म सोडणार नाही. तिच्यावर बळजबरी करण्यात आली आहे.
तिचे काका संजयसिंह म्हणाले, की दूरध्वनीवर बोलताना ती घाबरलेल्या अवस्थेत आहे, असे दिसून येत होते. ती कोणत्या तरी दबावाखाली बोलत होती. तिच्या शेजारी काही जण होते. ते तिला काय बोलावे ते सांगत होते. त्यांचा आवाज दूरध्वनीवर येत होता.
First Published: Saturday, August 11, 2012, 14:45