Last Updated: Monday, March 17, 2014, 19:49
www.zee24taas.com, वृत्तसंस्था, इस्लामाबादपाकिस्तानच्या सिंध प्रांतात शनिवारी रात्री एक धक्कदायक घटना घडलीय. एका धर्मग्रंथाला अपवित्र केल्याचा राग धरून रागावलेल्या लोकांनी एक मंदिर आणि एक धर्मशाळेला आग लावली. त्यानंतर जिन्नाबाग आणि आजुबाजूच्या काही परिसरात कर्फ्यू लावण्यात आला.
ज्यानं धर्मग्रंथाची पाने जाळली त्या व्यक्तीच्या घरीसमोर जमाव जमला होता. जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी अश्रूगॅसचे नळकांड्या सोडल्या. हिंदू समुदाय कोणताही धार्मिक गोष्टीचा अपमान सहन करु शकत नाही असं, स्थानिक हिंदू पंचायतीच्या कल्पना देवी यांनी सांगितलं.
स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार धर्मग्रंथ जाळली गेल्याची बातमी जशी सगळीकडे पसरली, त्याचवेळी काही विद्यार्थी आणि इतर जमावानं हिंदू मंदिर आणि त्याच्या बाजूला असलेल्या धर्मशाळासुद्धा जाळल्या.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो
करा.
First Published: Monday, March 17, 2014, 16:22