Last Updated: Tuesday, July 30, 2013, 16:43
www.24taas.com, झी मीडिया, लंडनब्रिटनमध्ये विकृतीची हद्द गाठत एका तरुणाने प्रेतावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. शरीरसंबंधांसाठी मुलीने नकार केल्याचा राग येऊन २३ वर्षीय तरुणाने हे दुष्कृत्य केलं.
२३ वर्षीय डेव्हिडची १६ वर्षीय साशाशी फेसबुकवर मैत्री झाली. डेव्हिड एका हॉटेलच्या बारमध्ये नोकरी करत होता. याच हॉटेलमध्ये साशालाही नोकरी मिळवून देऊ, असं आश्वासन डेव्हिडने तिला दिलं. त्यासाठी साशा डेव्हिडच्या हॉटेलमध्ये गेली. या हॉटेलमध्येच डेव्हिडने साशाचं लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. साशाने त्याला विरोध केल्यामुळे डेव्हिड चिडला आणि त्याने साशावर चाकून ५८ वार केले. यामुळे साशाचा जागीच मृत्यू झाला.
मात्र डेव्हिडचा राक्षसीपणा एवढ्यावरच थांबला नाही. साशाची हत्या केल्यावरही डेव्हिडचं मन भरलं नाही. त्याने साशाच्या प्रेतावर बलात्कार केला. त्यानंतर साशाचं प्रेत डेव्हिडने जाळून टाकलं. मात्र ब्रिटिश पोलिसांनी डेव्हिडला पकडलं. चौकशीमध्ये डेव्हिडने आपण साशाचा खून केल्याची आणि प्रेतावर बलात्कार केल्याची कबुली दिली. याबद्दल डेव्हिडला ३५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, July 30, 2013, 16:43