ऐकलंत का... मानवाचा जन्म नर डुक्कर आणि मादी चिम्पांजीपासून Humans emerged from male pig and female c

ऐकलंत का... मानवाचा जन्म नर डुक्कर आणि मादी चिम्पांजीपासून

ऐकलंत का... मानवाचा जन्म नर डुक्कर आणि मादी चिम्पांजीपासून
www.24taas.com, झी मीडिया, लंडन

मानवाचा जन्म नर डुक्कर आणि मादी चिम्पांजीपासून झालाय, असं म्हणणं आहे जगातील अव्वल अशा जेनेटिक्स तज्ज्ञांचं... मानव हा या दोघांची हायब्रिड उत्पत्ती आहे. जॉर्जिया विद्यापीठाचे डॉ. इउजीन मॅककार्थी या प्राणीशास्त्राच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं की, एक आफ्रिकन चिम्पांजीमध्ये आणि मानवात अनेक बाबतीत साम्य असल्याचे पुरावे सापडले आहेत. ते पुढं म्हणतात, मानव फक्त वानराची उत्क्रांती नाहीय, तर नर डुक्कर आणि मादी चिम्पांजीचे त्याच्यात अंश आहेत.

संपूर्ण प्राणी विश्वात फक्त एकच प्राणी हे दाखवून देतो की, मानव आमच्या वंशांचा आहे, तो म्हणजे डुक्कर... डॉ. इउजीन मॅककार्थी पुढं समजावून सांगतात, जेनेटिकली आपण चिम्पांजीच्या जवळचे आहोत आणि अनेक साम्य आणि वेगळेपण दोघांमध्ये आहे. मात्र तथ्य सांगतं की, काही तरी अद्वितीय निर्माण करण्यासाठी क्रॉस ब्रिडिंग आवश्यक आहे. आफ्रिकन वानर हा मानव वंशात येतो. तेव्हा त्याचं हायब्रिडायजेशन विना-मानव कॅटेगिरीत करावं लागतं.

डॉ मॅककार्थी म्हणतात, चार्ल्स डार्विन यांनी मानवी उत्क्रांतीच्या केवळ अर्धी कथा सांगितलीय. डुकरांचाही मानव उत्कांतीत महत्त्वाचा वाटा आहे. काही गृहितं म्हणून आपण हे बघितलं पाहिजे, की मानव हा नर डुक्कर आणि मादी चिम्पांजीचं हायब्रिडायझेशन आहे, असंही ते म्हणाले. डॉ. मॅककार्थीनुसार जर आपण मानवाची तुलना मगर, बेडुक, ऑक्टोपस, स्टारफिश, डुक्कर आणि चिम्पांजी सोबत केली तर त्यांच्यात साम्य आढळून येतं.

डुक्कर आणि चिम्पांजींचे क्रोमोझोम म्हणजेच गुणसूत्र संख्या वेगळी आहे. खरं तर असं मानलं जातं गुणसूत्र संख्या वेगळी असलेल्या प्राण्यांची अशाप्रकारं हायब्रिडायझेशन होऊ शकत नाही. हा नियम आहे, फक्त एक सामान्य विधान आहे. मात्र अशा फरक संकरीत अपत्याचा कस प्रतिकूल परिणाम नसल्यानं, तो पालक गुणसूत्र संख्यामध्ये भिन्न असतो. ज्या ओलांडत विभिन्न प्रकारचे अपत्य उत्पादनाची निर्मिती करण्यात ते स्वत: सक्षम आहेत. याचाच एक पुरावा म्हणजे सस्तन प्राणी एकत्र येऊन एक संकरीत उत्पन्न करु शकतात.

दुसरी बाब म्हणजे, डॉ. मॅककार्थी म्हणतात माणसाच्या हृदयातील व्हाल्व बुझले असल्यास डुकराचे व्हाल्व बदलवता येतात. तसंच डुकराच्या त्वचेचा उपयोग जळलेल्या मानवाची त्वचेवर उपचार करण्यासही वापरतात. एवढंच नव्हे तर अत्यंत गंभीर परिस्थितीत डुकराची किडनी मानवाला वाचवू शकते. त्याचं प्रत्यारोपण करता येतं. मग प्रश्न हाच उपस्थित होतो, की फक्त डुकरातच हे कसं काय शक्य आहे. बकरी, कुत्रा, अस्वल इतर प्राण्याचे अवयव का वापरता येत नाहीत. याचं कारण म्हणजे डुक्कर आणि मानवात साम्य आहे.

खरं तर डुक्कर आणि चिम्पांजीमध्ये खूप फरक आहे. त्यामुळं संभोगासाठी ते एकमेकांना कसं निवडू शकतील, असा प्रश्न निर्माण होतो. त्यांचं शरीर आणि वर्तन वेगळं आहे. प्राणी संभोगासाठी स्वत:शी सुसंगत, नैसर्गिक साधर्म्य असलेला प्राणी शोधतो. पण असं संकर क्वचितच दिसून येतं.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, December 3, 2013, 19:30


comments powered by Disqus