अबब! राहत्या घरात हे किती अजगर आणि साप!Hundreds of living, dead pythons found in US home

अबब! राहत्या घरात हे किती अजगर आणि साप!

अबब! राहत्या घरात हे किती अजगर आणि साप!
www.24taas.com, वृत्तसंस्था, कॅलिफोर्निया

अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया इथं एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका शिक्षकाच्या घरात एक-दोन नव्हे तर शेकडो अजगर आणि साप आढळले आहेत. या शिक्षकाला अटक करण्यात आलीय.

कॅलिफोर्नियामधील एका उपनगरामधील एका घरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. या घरात शेकडो अजगर आणि साप आढळले. यातील काही अजगर आणि साप हे मृत आढळले. या प्रकरणी तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना या घरामध्ये सुमारे ४०० साप आढळून आले. त्याचबरोबर, या घरामध्ये अनेक उंदीरही असल्याचं तपास करणाऱ्या अधिकाऱ्यानं सांगितलं.

याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचं नाव बुचमन (वय ५३) असून त्याच्याविरोधात जनावरांची योग्य ती काळजी न घेतल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. या घरामध्ये जमिनीपासून ते छतापर्यंत तसंच प्रत्येक भिंतीवर प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये सर्वत्र सापच असल्याचं या प्रकरणी तपास करणाऱ्या सोंड्रा बर्ग यांनी सांगितलं. तसंच या सर्व सापांची माहितीही नोंदवून ठेवण्यात आली होती. बुचमन यानं पोलिसांना आपण एका सापांच्या प्रजननाचा व्यवसाय करणाऱ्या कंपनीशी संबंधित असल्याचं सांगितलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, January 30, 2014, 17:08


comments powered by Disqus