Last Updated: Tuesday, March 11, 2014, 21:42
www.24taas.com, झी मीडिया, टेक्सास अमेरिकेत धक्कादायक बाब उघड झाली आहे. पतीची नोकरी गेल्याने पत्नीने पतीला जाळण्याची घटना टेक्सासमध्ये पुढे आली आहे. ही महिला भारतीय वंशाची आहे. तिला 99 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
अमेरिकेतील टेक्सास प्रांतात ही घटना दोन वर्षांपूर्वी घडल्याचे उघड बाब झाले आहे. पतीला जाळून मारल्याचे पत्नीने मान्य केले. श्रीया बिमल पटेल (27) असे या महिलेचे नाव आहे. पती बिमलची नोकरी जाऊन तो कर्जबाजारी झाल्यामुळे त्याला जाळून मारले.
पतीला मारण्यासाठी श्रीयाने गॅसोलिनचा स्फोट घडवून आणला. बिमलला जाळल्यानंतर त्याचा पाच महिन्यांनंतर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या प्रकरणाचा खटला सुरू होता.
दरम्यान, श्रीया ही उच्चशिक्षित असून, तिचे राहणीमान उच्चभ्रू होते. म्हणूनच बिमलची नोकरी गेल्याने तो आपल्या अपेक्षेनुसार राहत नसल्याचे तिला लज्जासपद वाटत होते, असे विरोधी पक्षाच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, March 11, 2014, 21:36