न्यूटाऊन गोळीबार : लहानग्याचे अखेरचे शब्द, आय लव्ह यू मॉम... , I love you mom, wrote a kid before US school shooting

न्यूटाऊन गोळीबार : लहानग्याचे अखेरचे शब्द, आय लव्ह यू मॉम...

न्यूटाऊन गोळीबार : लहानग्याचे अखेरचे शब्द, आय लव्ह यू मॉम...
www.24taas.com, न्यूटाऊन

अमेरिकेच्या कनेक्टिकटमध्ये एका शाळेत झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं सगळं जगालाच धक्का बसलाय. त्याचवेळी या हल्ल्यात जखमी झालेल्या एका विद्यार्थ्यांना मरणापूर्वी आपल्या आईला उद्देशून ‘आई लव्ह यू मॉम’ म्हणणारं पत्र पाहून अनेकांचं हृदय पिळवटून निघालंय.

एका इंग्रजी न्यूज चॅनलनं दिलेल्या बातमीनुसार, गोळीबारात जखमी झालेल्या या लहानग्यानं आपला जीव जाण्याच्या अगोदर आपल्या आईला एक पत्र लिहिलंय. ‘आय लव्ह यू मॉम... मी खूश आहे आणि चांगलाही... मला खूप दु:ख होतंय की मी एक चांगला मुलगा बनू शकलो नाही. दुसऱ्या जगात राहूनही मी तुझ्यावर खूप प्रेम करेन - तुझा ब्रायन’ असं या मुलानं आपल्या पत्रात लिहिलंय.

सगळ्यांनाच धक्का देणाऱ्या या गोळीबाराच्या घटनेनं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याची डोळ्यांत पाणी आणलं... कनेक्टिकटच्या ‘सॅन्ड्री हूक एलिमेन्टरी स्कूल’मध्ये शुक्रवारी झालेल्या गोळीबारात २० मुलांसहीत २८ लोकांना आपल्या प्राणाला मुकावं लागलंय. एका २० वर्षीय माथेफिरूनं या शाळेत अंदाधुंद गोळीबारात गोळीबार करणाऱ्या माथेफिरुची आई ठार झाली त्यानंतर माथेफिरुनं स्वत: गोळी झाडून आत्महत्या केलीय.

न्यूटाऊनच्या परिसरात असलेल्या या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या मुलांचं वय जेमतेम १० वर्षांचं आहे तर इतर सात जणांमध्ये शाळेच्या प्राध्यापिका डॉन हॉकस्प्रंग आणि मनोविश्लेषक मेरी शेरलाच यांचाही समावेश आहे.

First Published: Saturday, December 15, 2012, 16:30


comments powered by Disqus