`आयबीएम` देणार १५ हजार कर्मचाऱ्यांना डिच्चू, IBM to cut 15,000 jobs globally, lay-offs start from Ba

`आयबीएम` देणार १५ हजार कर्मचाऱ्यांना डिच्चू

`आयबीएम` देणार १५ हजार कर्मचाऱ्यांना डिच्चू

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आयटी क्षेत्रात अग्रेसर मानल्या जाणाऱ्या `आयबीएम` या संस्थेनं कामगार कपातीचा निर्णय घेतल्यानं उद्योग क्षेत्राला एकच धक्का बसलाय. या संस्थेतून जगभरात १५ हजार कामगारांना घरचा रस्ता दाखविण्यात येणार असल्याचं समजंतय. यामध्ये, भारतासह ब्राझील आणि युरोपीयन देशांचाही समावेश आहे.

`आयबीएम`च्या कामगार कपातीची सुरुवात बंगळुरू स्थित युनिटमधून करण्यात आलीय. या युनिटमधून १२ फेब्रुवारी रोजी तब्बल ४० जणांना `पिंक स्लीप` देऊन घरी पाठवण्यात आल्याचं कंपनीच्या सूत्रांनी सांगितलंय. सहा आठवडय़ांचा पूर्ण पगार देऊन काही कामगारांना घरी पाठविण्यात आल्याचं समजतंय.

भारतात `आयबीएम`मध्ये जवळपास लाखभर कर्मचारीवर्ग कार्यरत आहे. तर जगभरात हीच संख्या ४ लाखांच्या घरात आहे. देशातील कामगार कपातीमुळे कंपनीने आपला २.३ दशलक्ष डॉलरचा (१४३०० कोटी रुपये) व्यवसाय लेनोव्होला हस्तांतरित करायचे ठरविले आहे.

सन २०१५ पर्यंत कंपनीचे उत्पन्नाचे लक्ष्य १२४० कोटी ठरविण्यात आले होते. सध्याची स्थिती पाहता कामगार कपात करून कंपनीला ते गाठता येणे अशक्य झाले आहे. `आयबीएम`ने आपल्या अहवालात पाच टक्के उत्पन्न घटल्याचे डिसेंबरच्या पहिल्या सप्ताहात म्हटलं होतं. जगभरातून पंधरा हजार कर्मचारी कपात पहिल्या टप्प्यात करण्याचा कंपनीचा इरादा असून २६ फेब्रुवारीपर्यंत दुसऱ्या टप्प्यात अमेरिकेत त्याची अंमलबजावणी होणार आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, February 14, 2014, 21:52


comments powered by Disqus