पाकिस्तानचा हा क्रिकेटर होता भुत्तोचा बॉयफ्रेंड , imran khan and bhutto affair

पाकिस्तानचा `हा` क्रिकेटर होता `भुत्तो`चा बॉयफ्रेंड

पाकिस्तानचा `हा` क्रिकेटर होता `भुत्तो`चा बॉयफ्रेंड

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी आणि बिलावल भुट्टो यांच्याबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे. झरदारी पुत्र बिलावल भुट्टो आणि विदेश मंत्री हिना रब्‍बानी खार यांच्‍यातील प्रेमसंबंधाच्‍या बातम्‍यांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ज्‍याच्‍या-त्‍याच्‍या तोंडी हाच विषय सुरू आहे.

मात्र, काही वर्षांपूर्वी बिलावलची आई पाकिस्‍तानच्‍या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो आणि क्रिकेटपटू इम्रान खान यांच्‍यातील प्रेमप्रसंगाची चर्चा आजही चवीने चर्चिली जाते. तरूणपणी प्‍ले बॉय नावाने प्रसिद्ध असलेला इमरान आणि बेनझीर ऑक्‍सफोर्ड विद्यापीठात एकत्र शिकत होते.

तेव्‍हाच दोघांमध्‍ये सूत जुळले होते. बेनझीर आणि इमरान यांच्‍यातील प्रेमसंबंध साऱ्या जगाला परिचित होते. लंडनमध्ये असताना त्यांच्या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचे समजते.

First Published: Sunday, September 30, 2012, 09:27


comments powered by Disqus