इमरान खान डोक्यावर पडले, गंभीर जखमी, imran khan collapse from lifter, injured

इमरान खान डोक्यावर पडले, गंभीर जखमी

इमरान खान डोक्यावर पडले, गंभीर जखमी
www.24taas.com, लाहोर

पाकिस्तानच्या तहरिक–ए-इंसाफ पक्षाचे सर्वेसर्वा आणि माजी क्रिकेटपटू इमरान खान एका प्रचार सभेदरम्यान व्यासपीठावरून खाली पडून गंभीर जखमी झालेत. लाहोरमध्ये एका प्रचारसभेदरम्यान ही घटना घडली.

एका जाहीर सभेसाठी स्टेज जवळजवळ १४ फूटांवर बांधण्यात आलं होतं. स्टेजवर जाण्यासाठी लिफ्टरचा वापर केला गेला होता. इमरान खान यांचं सभेत आगमन झाल्यानंतर त्यांना याच लिफ्टरच्या सहाय्यानं व्यासपीठावर नेलं जात होतं. मात्र, त्याच वेळी तोल सुटला आणि इमरान खान खाली पडले. इमरान खान यांना वाचविण्याची त्यांच्या समर्थकांनी प्रयत्न केला मात्र, ते कार्यकर्तेही खाली पडले. या दुर्घटनेत इमरान खान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झालीय. दुर्घटनेनंतर त्यांना शौकत खानम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

पाकिस्तानमध्ये येत्या ११ मे रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहेत. त्यामुळेच इमरान खान प्रचार सभेत व्यस्त होते. मात्र, लाहोरमध्ये हा प्रकार घडल्यानं तहरिक ए इंसाफचे कार्यकर्त्यांसमोर मात्र पेचप्रसंग उभा राहिलाय.

First Published: Wednesday, May 8, 2013, 09:11


comments powered by Disqus