Last Updated: Thursday, May 8, 2014, 10:21
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली पाकिस्तानल्या राजकारणातला एक मोठा नेता आणि माजी क्रिकेटर इमरान खान यांच्या कथित नव्या प्रेमसंबंधांमुळे पाक राजकारणात एकच खळबळ उडालीय.
पाकमधील तहरिक – ए – इंसाफ या पक्षाचे 61 वर्षीय अध्यक्ष इमरान खान सध्या एका 21 वर्षांच्या तरुणीच्या प्रेमपाशात गुंतलेत. ही तरुणी म्हणजे पाकिस्तानच्या सगळ्यात श्रीमंत व्यक्तीची म्हणजेच मियाँ मुहम्मद मंशा यांची भाची असल्याचं सांगण्यात येतंय. पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या काही जवळच्या उद्योगपतीमध्ये मियाँ मंशा यांचाही समावेश आहे.
ऊर्दू वर्तमानपत्र ‘पाकिस्तान पोस्ट’नं दिलेल्या बातमीनुसार, संबंधित 21 वर्षीय तरुणी लवकरच इमरान खान यांच्या मुलाची आई होण्याची शक्यता आहे. या बातमीनंतर पाकिस्तानी राजकारणात मात्र भूकंप झालाय.
वर्तमान पत्रानं सूत्रांच्या हवाल्यावर मीडियापासून दूर ठेवण्यासाठी संबंधित तरुणीला लंडनला पाठवण्यात आल्याचं सांगितलंय. अनेक पत्रकारांनीही या बातमीला दुजोरा दिलाय.
परंतु, इमरान खान यांच्या सूत्रांनी मात्र या सर्व गोष्टी अफवा असल्याचं सांगितलंय. परंतु, हाच विषय सध्या लोकांच्या चर्चेचा विषय झालाय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, May 8, 2014, 10:21