महिलांनो सावधान! चोरीची अजब `केस` increasing case of hair robbery

महिलांनो सावधान! चोरीची अजब `केस`

महिलांनो सावधान! चोरीची अजब `केस`
www.24taas.com, झी मीडिया, माराकॅबो

लोक घराबाहेर पडताना आपलं पाकिट, पर्स, मोबाईल चोरीला जाऊ नये, म्हणून खबरदारी घेत असतात. मात्र व्हेनेझुएला येथे महिलांना मात्र वेगळ्याच गोष्टीपासून सावधान राहवं लागतंय. व्हेनेझुएलामध्ये महिलांचे केस चोरीला जाण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. सध्या या भागात एक चोरांची टोळी सक्रिय झाली आहे, जी भर रस्त्यात महिलांचे केस कापून ते पळवून नेतात.

यासंदर्भात एका महिलेने सांगितलं, की आधी एका चोरांच्या टोळीने तिला बंदुक दाखवून घाबरवलं, तेव्हा आधी तिचा मोबाईल, पर्स चोरून नेतील असं तिला वाटलं. मात्र या चोरांनी चक्क तिसे केस कापून ते पळवून नेले. व्हेनेझुएलामध्ये चांगल्या क्वालिटीचे केस २०० पाऊंड किमतीला विकले जातात. या केसांचा वापर विग बनवण्यासाठी केला जातो.

जेव्हापासून केसांच्या चोरीचा प्रकार वाढला आहे, तेव्हापासून विग वापरणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. हे चोर महिलांना भर रस्त्यात बंदुक दाखवतात आणि त्यांना केसांची पोनीटेल बांधायला लावतात. त्यानंतर वस्तऱ्याने पोनीटेल कापून टाकतात आणि पळून जातात. व्हेनेझुएला येथील माराकॅबो या शहरात केसचोरीच्या घटना वाढल्या आहे. शॉपिंग मॉलमध्येही या चोरांच्या भीतीने सुरक्षारक्षकांची संख्या वाढवण्यात आली आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, August 10, 2013, 15:56


comments powered by Disqus