Last Updated: Wednesday, October 23, 2013, 10:35
www.24taas.com, वृत्तसंस्था, बीजिंगपंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग सध्या रशिया आणि चीनच्या दौ-यावर आहेत. रशियातून काल चीनमध्ये दाखल झालेत. चीनमध्ये आज ते अध्यक्ष क्सी जिनपिंग यांच्याशी आणि पंतप्रधान ली कियांग यांची भेट घेणार आहेत. यावेळी भारत-चीन सीमा सहकार करारावर स्वाक्षरी होणार आहे.
सीमा सहकार करारासह अनेक महत्त्वाच्या करारांवर यावेळी स्वाक्ष-या होणार आहेत. याशिवाय ते चीन आणि भारत सीईओ फोरमच्या परिषदेसाठी उपस्थित असलेल्या उद्योजकांचीही भेट घेणार आहेत. पंतप्रधान मनमोहन सिंग यांची ही भेट फार महत्त्वाची आहे. त्यातून अनेक पातळ्यांवर भारत चीन संबंध दृढ होण्यास मदत होईल असं चीनने म्हटलंय.
त्याआधी पंतप्रधान यांनी रसियाचा दौरा केला. भारत आणि रशिया यांच्यातील आण्विक सहकार्य वाढविण्यावर दोन्ही नेत्यांनी चर्चेवेळी भर दिला. कुडनकुलम अणू प्रकल्पातील तीन व चार क्रमांकाची अणुभट्टी कार्यान्वित करण्यासाठी सर्व अडचणींवर त्वरित उपाय योजन्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दोन्ही नेत्यांनी दिले.
दरम्यान, भारत हा आमचा महत्त्वाच्या सहकारी आहे. दोन्ही देशांच्या दरम्यानचे संबंध अधिक दृढ करण्यामध्ये डॉ. मनमोहनसिंग यांचा मोठा वाटा आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे, अशा शब्दांत पुतीन यांनी डॉ. मनमोहन सिंग यांचे कौतुक केले.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, October 23, 2013, 10:35