2030मध्ये भारत बनेल महासत्ता, अमेरिकेचा दावा India will be superpower in 2030

२०३० मध्ये भारत बनेल महासत्ता, अमेरिकेचा दावा

२०३० मध्ये भारत बनेल महासत्ता, अमेरिकेचा दावा
www.24taas.com, वॉशिंग्टन


२०३० मध्ये भारत आर्थिक महाशक्ती बनेल, असं भाकीत अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने केलं आहे. २०३०मध्ये चीनच्या आर्थिक दराला मागे टाकत भारत सर्व देशांच्या पुढे जाईल आणि चीनला मागे टाकेल.

२०३० मधील अर्थव्यवस्थेशी संबंधित जगाची कल्पना करून अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने एक रिपोर्ट तयार केला. या रिपोर्टनुसार २०३० भारत जागतिक महासत्ता बनेल. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी २०२०मध्ये भारत महासत्ता बनल, असा विश्वास व्यक्त केला होता. अमेरिकन गुप्तचर खात्याने यासाठी एजून एका दशकाचा अवकाश असल्याचं सांगितलं आहे.

गुप्तचर विभागाच्या रिपोर्टनुसार, चीन आणि भारतात भविष्यात अटीतटीची स्पर्धा निर्माण होईल. काही वर्षांनी चीनला पिछाडीवर टाकत भारत त्या स्थानी पोहोचेल, जे आज चीनचं आहे. चीनचा सध्या असणारा ८ ते १०% विकास दर इतिहासजमा झाला असेल. या महात्तेच्या स्पर्धेत पाकिस्तानचा समावेश नसेल, असंही गुप्तचर विभागाने म्हटलं आहे.

First Published: Wednesday, December 12, 2012, 17:03


comments powered by Disqus