Last Updated: Saturday, May 24, 2014, 00:02
www.24taas.com, झी मीडिया, काबूलअफगाणिस्तानात भारतीय दूतावासावर झालेल्या हल्ल्यात चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय. इथल्या हेरात शहरात असलेल्या भारतीय दूतावासाबाहेर सकाळी सव्वा तीन वाजता बंदूक आणि ग्रेनेडनं हल्ला केला.
मात्र आय.टी.बी.पी. आणि अफगाणिस्तानच्या सैनिकांनी दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिलं. दुतावासामधील सर्व भारतीय सुरक्षित आहेत. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती हमीद करजई नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला भारतात येणार असताना हा हल्ला झालाय.
दुसरीकडे या हल्ल्यानंतर मोदींनी भारतीय राजदूतांना फोन केला. राजदूतांकडून मोदींनी या हल्ल्याबाबत माहिती घेतली असून त्यांनी दुतावासातील कर्मचा-यांना सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलंय. दरम्यान हमिद करझाईंनी देखील नरेंद्र मोदींशी फोनवरून संवाद साधला असून या हल्ल्याबाबत सविस्तर माहिती दिलीये.
तर अफगाणिस्तानातला दहशतवादी हल्ला आणि 26 मे रोजी होणारा नरेंद्र मोदींचा शपथविधी आधी भारत-पाक सीमेवर जागते रहोचा इशारा देण्यात आलाय.
भारतीय सैन्य दलाला अलर्ट करण्यात आलंय.. या सोहळ्या आधी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आलीय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, May 24, 2014, 00:02