Last Updated: Sunday, April 13, 2014, 14:26
www.24taas.com, वृत्तसंस्था, न्यूयॉर्क भारतीय वंशांच्या मीरा जोशी या न्यूयॉर्क टॅक्सी एजंसीच्या सीईओ बनल्या आहेत. शुक्रवारी न्यूयॉर्क सिटी काऊंसिलमध्ये मीरा यांच्या समर्थनार्थ ४६ मतं पडली. आता मीरा न्यूयॉर्क सिटी टॅक्सी अॅण्ड लेमोजिन कमिशन (टीएलसी)चे प्रमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करेल.
ही एजंसी शहरात पिवळी आणि हिरवी टॅक्सी सोबतच लेमोजिन कार्सचं नेटवर्क सांभाळते. स्थानिक मेअरनं ८ मार्चला मीरा यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. पेंसिलवेनिया महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी मीरा यावेळी म्हणाल्या, "मेअर डी. ब्लासियो यांच्याकडून नियुक्ती म्हणजे त्यांचा सन्मान आहे. सोबतच मला आनंद आहे की शहरातील परिषदेनं माझ्यावर विश्वास ठेवला."
मीरा जोशी या मुळच्या भारतीय वंशांच्या आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, April 13, 2014, 14:26