Last Updated: Friday, May 24, 2013, 13:14
‘नॅशनल जिओग्राफी’चे २५ हजार डॉलर्सचे पारितोषिक www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन ‘नॅशनल जिओग्राफिक बी २०१३’ या स्पर्धेत भारतीय वंशाचा १२ वर्षीय सात्विक कर्णिक चमकला. भौगोलिक ज्ञानावर आधारित असणाऱ्या आणि अत्यंत कठीण अशा या स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या सात्विकला २५ हजार अमेरिकन डॉलरची शिष्यवृती मिळणार आहे.
नॅशनल जिओग्राफिक सोसायटीद्वारा १९८९ पासून दरवर्षी आयोजित केल्या जाणार्याओ या स्पर्धेत या वर्षी जवळपास ५० लाख विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यासाठी निवड झालेल्या बोस्टनमध्ये राहणाऱ्या सात्विकला परीक्षकांनी पृथ्वीच्या केंद्रस्थानी जोडल्या गेलेल्या तसेच आशियाच्या पर्वतरांगा आणि ब्रिटनशी संबंधित भौगोलिक प्रश्न विचारले होते.
सातवीत शिकणार्यां हिंदुस्थानी वंशाच्या सात्विकने या सर्व प्रश्नांाची अचूक उत्तरे देत अन्य स्पर्धकांवर मात करत ‘नॅशनल जिओग्राफिक’ स्पर्धेचा किताब पटकावला. २५ हजार अमेरिकन डॉलर्सच्या शिष्यवृत्तीबरोबर अन्य काही पुरस्कारसुद्धा त्याने पटकावले असून गालापागोस बेटाची ट्रीपसुद्धा त्याला विनामूल्य मिळणार आहे.
अंतीम १० पैकी ८ भारतीय वंशाचेया स्पर्धेत सहभागी झालेल्या ५० लाख विद्यार्थ्यांमधून अंतिम स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या दहा स्पर्धकांपैकी आठ भारतीय वंशाचे होते. पृथ्वीच्या केंद्रस्थानापासून सर्वात दूरवर असणारे पर्वत कोणते? या प्रश्ना वर ‘चिम्बोराजो पर्वत’ असे अचूक उत्तर सात्विकने दिले.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, May 24, 2013, 13:14