क्षमा सावंत अमेरिकन निवडणुकीत विजयी, Indian-origin Kshama Sawant is first elected socialist in US

पुण्याची क्षमा सावंत अमेरिकन निवडणुकीत विजयी

पुण्याची क्षमा सावंत अमेरिकन निवडणुकीत विजयी
www.24taas.com, वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

मूळची भारतीय आणि पुण्याची कन्या क्षमा सावंत हिने अमेरिकन सिएटल सिटी काऊंसिलवर आपला विजय नोंदविला आहे. तब्बल ९७ वर्षानंतर काऊंसिलवर सोशालिस्ट व्यक्तीचा प्रवेश केला आहे.

क्षमा यांचे वय ४० वर्षे आहे. त्या सॉफ्टवेअर इंजिनर आहेत. त्या युनायटेड स्टेटमध्ये अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका आहे. त्या पार्टटाईम म्हणून काम करीत आहेत. क्षमा सावंत यांचा जन्म पुण्याचा आहे.

अमेरिकेतील सिऍटल सिटी काऊंसिलमध्ये प्रथमच सोशालिस्ट व्यक्तीचा प्रवेश झाला आहे. काऊंसिलवरच्या निवडणुकीत त्यांनी रिचर्ड कॉलिन या प्रतिस्पर्ध्याचा १६४० मतांनी पराभव केला. क्षमा सावंत अर्थतज्ज्ञ आहेत. अमेरिकन फेडरेशन ऑफ टीचर्स लोकल या संघटनेच्या त्या सदस्या आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

फोटोफीचर क्षमा सावंत

First Published: Wednesday, November 20, 2013, 13:12


comments powered by Disqus