भारतीय विद्यार्थ्यावर ऑस्ट्रेलियात हल्ला, एकाला अटक, indian student Rajwinder Singh attacked

भारतीय विद्यार्थ्यावर ऑस्ट्रेलियात हल्ला, एकाला अटक

भारतीय विद्यार्थ्यावर ऑस्ट्रेलियात हल्ला, एकाला अटक
www.24taas.com, वृत्तसंस्था, मेलबर्न

ऑस्ट्रेलियात पुन्हा एका भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला करण्यात आलाय. या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. भारतीय विद्यार्थी आणि त्याच्या दोन मित्रांना लाथा, बुक्क्यांनी आणि काठिने बेदम मारहाण करण्यात आलेय. दरम्यान, त्याला बेशुध्द अवस्थेत अल्फ्रेड रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.

ऑस्ट्रेलियात एका आठ जणांच्या टोळीने मनरियाजविंदर सिंग आणि त्याच्या दोन मित्रांवर रविवारी मेलबर्नच्या प्रिन्सेस ब्रिजवर हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला मनरियाजविंदर कोमामध्ये गेला आहे.

या हल्ल्यात सहभागी असणाऱ्या आणखी दोन संशयितांची ओळख पटली आहे. मेलबर्न विद्यापीठात वाणिज्य शाखेच्या पदवीचा अभ्यास करणाऱ्या मनरियाजविंदर आणि त्याच्या दोन मित्रांवर रविवारी आठ जणांच्या टोळक्याने हल्ला केला. याप्रकरणी ऑस्ट्रेलियन पोलिसांनी एकाला अटक केली आहे. या आरोपीची कोठडी मिळवण्यासाठी त्याला न्यायालयात हजर केले होते.

दरम्यान मेलबर्नमधील भारतीय दूतावास पोलीस, रुग्णालय आणि मनरियाजविंदरच्या नातेवाईकांच्या सतत संपर्कात असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. मनरियाजविंदरचा भाऊ यादविंदर सिंगने ऑस्ट्रेलियन सरकारकडे दोषींना कारवाई करण्याची मागणी केली आहे.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, December 31, 2013, 12:19


comments powered by Disqus