दुबईत भारतीय महिलेचा मृत्यू Indian woman falls to death from 18th floor of Abu Dhabi tower

दुबईत भारतीय महिलेचा मृत्यू

दुबईत भारतीय महिलेचा मृत्यू
www.zee24tass.com, झी मीडीया, अबू धाबी

दुबईतील एका इमारतीच्या मजल्यावरु पडल्याने एका भारतीय महिलाचा मृत्यू झाला. ती १८ व्या मजल्यावर पडल्याने गंभीर जखमी झाली. यात तिचा मृत्यू झाला. मात्र, या महिलेचे नाव समजू शकलेले नाही.

ही घटना दुबईची राजधानी अबू धाबीमध्ये घडली. मंगळवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास अबू धाबीतील अल फलाह स्ट्रीटवरील लिवा टॉवरवरुन ही महिला खाली पडली. ती एका कारवर रक्तबंबाळ अवस्थेत आढलली. याची माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली.

आपण लिवा टॉवरच्या खालीच होतो. अचानक जोरात काहीतरी आदळण्याचा आवाज मला आला. म्हणून मी पाहिले तर ती महिला एका कारवर रक्तांच्या थारोळ्यात पडली होती, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. हा घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.


First Published: Friday, March 7, 2014, 15:57


comments powered by Disqus