भारताची लक्ष्मी ठरली ‘इंटरनेशनल विमेन ऑफ करेज’, indian woman receives international women of courage

भारताची लक्ष्मी ठरली ‘इंटरनेशनल विमेन ऑफ करेज’

भारताची लक्ष्मी ठरली ‘इंटरनेशनल विमेन ऑफ करेज’
www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन

स्वत: अॅसिड हल्ला पीडित असूनही हिंमत न हारता अशाच हल्ल्यांविरुद्ध आंदोलन सुरू करणाऱ्या लक्ष्मीला आज अमेरिकेतील प्रतिष्ठीत `इंटरनॅशनल विमेन ऑफ करेज अॅवॉर्ड`नं सन्मानित करण्यात आलंय.

अमेरिकेच्या प्रथम महिला मिशेल ओबामी यांच्या हस्ते या पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या दहा महिलांना सन्मानित करण्यात आलं. या पुरस्कार विजेत्या महिला जगभरातील महिलांसमोर प्रेरणास्त्रोत बनून उभ्या राहिल्यात.

`जेव्हा आपण बदलासाठी या महिलांना आपला आवाज उंचावताना, पाऊल पुढं टाकताना आणि दुसऱ्यांनाही सशक्त करताना पाहतो तेव्हा आपल्यालाही प्रत्येकाकडे तीच ताकद आणि जबाबदारी असल्याची जाणीव होते` असं मिशेल ओबामा यांनी म्हटलंय. लक्ष्मीनं या कार्यक्रमात आपली एक कविता सादर केली.

अवघ्या १६ वर्षांची असताना लक्ष्मीच्या एका परिचित व्यक्तीनंच तिच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकलं होतं.... त्यामुळे तिचा चेहरा कुरुप बनला होता. ही घटना घडली तेव्हा ती नवी दिल्लीच्या गजबजलेल्या खान मार्केटमध्ये बस स्टॉपवर बससाठी वाट पाहात होती.

गेल्या वर्षी हाच पुरस्कार डिसेंबर २०१२ मध्ये दिल्लीत चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्काराचा बळी ठरलेल्या निर्भयाला समर्पित करण्यात आला होता.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, March 5, 2014, 18:33


comments powered by Disqus