अफगाणिस्तानात भारतीय लेखिकेची गोळ्या घालून हत्या, Indian writer Sushmita killed in Afghanistan

अफगाणिस्तानात भारतीय लेखिकेची गोळ्या घालून हत्या

अफगाणिस्तानात भारतीय लेखिकेची गोळ्या घालून हत्या
www.24Taas. झी मीडिया, काबूल

भारतीय लेखिका सुश्मिनता बॅनर्जी यांची काबुलमध्येच तालिबान्यांनी गोळ्या घालून हत्या केली. त्यांनी अफगाणिस्तानात तालिबानी सत्ता असताना आलेल्या अनुभवांवर आधारीत दोन पुस्तके लिहिली आहेत.

सुष्मिता बॅनर्जी यांची काबुलमध्येच गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचे वृत्त बीबीसीने दिले आहे. त्यांच्याच एका पुस्तकावर ‘एस्केप फ्रॉम तालिबान’ नावाने चित्रपटही बनला होता. मूळच्या कोलकाता येथे राहणार्याि सुश्मि ता बॅनर्जी यांनी १९८८ मध्ये अफगाणी उद्योजकाशी लग्न केले होते.

पकतिका प्रांतातील खराना येथे सुश्मिरता पतीसह राहत होत्या. त्यांच्या घरात घुसलेल्या तालिबानी दहशतवाद्यांनी पतीसह अन्य कुटुंबीयांना बांधून ठेवले आणि सुश्मिाता यांना बाहेर नेऊन गोळ्या घातल्याचे वृत्त आहे. नंतर सुश्मिमता यांचा मृतदेह तसाच टाकून दहशतवादी निघून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.

सैयद कमाला या नावानेही परिचित असलेल्या सुश्मितता पकतिका प्रांतात आरोग्य अधिकारी म्हणून काम करीत होत्या आणि या कामाचा एक भाग म्हणून स्थानिक महिलांच्या स्थितीचे चित्रीकरणही करत होत्या, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. या हत्येची जबाबदारी अद्याप कोणी स्वीकारलेली नाही.

तालिबानच्या तावडीतून १९९५ मध्ये निसटण्याच्या प्रसंगावर काबुलीवालार बंगाली बोऊ (मराठी अनुवाद : काबुलीवाल्याची बंगाली बायको) हे त्यांचे पुस्तक गाजले. याच पुस्तकावर २००३ मध्ये एस्केप फ्रॉम तालिबान हा सिनेमा काढण्यात आला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, September 6, 2013, 08:15


comments powered by Disqus