प्रॉपर्टी खरेदीत दुबईत भारतीयच अव्वल Indians top in Dubai property purchase

प्रॉपर्टी खरेदीत दुबईत भारतीयच अव्वल

प्रॉपर्टी खरेदीत दुबईत भारतीयच अव्वल
www.24taas.com, वृत्तसंस्था, दुबई

भारतीय कोणत्या ठिकाणी कशात अव्वल नसतील तर नवल... नुकतंच `गल्फ न्यूज` या दैनिकानं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार दुबईत प्रॉपर्टी खरेदीमध्ये भारतीयांनी अव्वल स्थान मिळवलंय. भारतीयांनंतर प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्यांमध्ये पाकिस्तान आणि ब्रिटनचा क्रमांक लागतो.

गेल्या वर्षी १६२ देशांतील धनिकांनी दुबईत प्रॉपर्टी खरेदी केल्याचं वृत्त आहे. जगभरातील नागरिकांचा गुंतवणुकीसाठी दुबईकडे कल वाढल्याची माहितीही वृत्तात देण्यात आलीय.

दुबईनंतर गुंतवणुकीसाठी नंबर लागतो तो संयुक्त अरब अमिरातमध्ये गेल्या वर्षात जवळपास ६४ अब्ज डॉलरची प्रॉपर्टी खरेदी करण्यात आलीय. २०१२मध्ये भारतीयांनी खरेदी केलेल्या प्रॉपर्टीची किंमत ८ अब्ज दिरहॅम होती. तर, ब्रिटिशांनी यावर्षी १०.४ दिरहॅमची प्रॉपर्टी खरेदी केलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, February 1, 2014, 12:48


comments powered by Disqus