Last Updated: Saturday, January 12, 2013, 08:07
www.24taas.com, इस्लामाबाद भारत आणि पाकिस्तादच्या वरिष्ठ नागरिकांच्या सोईसाठी दोन्ही देशांमध्ये नवीन व्हिजा धोरणाचा अवलंब करण्यात आलाय. आता दोन्ही देशांच्या वरिष्ठ नागरिकांना अटारी-वाघा संयुक्त चेक पोस्टवरूनच व्हिजा मिळू शकेल.
अटारी-वाघा बॉर्डरच्या चेक पोस्टवरून येत्या मंगळवारी म्हणजेच १५ जानेवारीपासून ही सुविधा उपलब्ध होणार आहे. ६५ वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींना सीमेवरच व्हिजाची सोय उपलब्ध होणार आहे. त्यासाठी एक स्वतंत्र व्हिजा काऊंटरही सुरू करण्यात आलंय.
या ठिकाणाहून व्हिजा प्राप्त करणाऱ्या व्यक्ती जास्तीत जास्त ४५ दिवसांपर्यंत दुसऱ्या देशात राहू शकतात तसंच देशातील कोणत्याही पाच शहरांत फिरण्याची परवानगी त्यांना असेल.
First Published: Saturday, January 12, 2013, 08:05