वाघ खाली भटकले, चार दिवस झाडावर लटकले, Indonesia men safe after five-day Sumatran tiger ordeal

वाघ खाली भटकले, चार दिवस झाडावर लटकले

वाघ खाली भटकले, चार दिवस झाडावर लटकले

www.24taas.com, झी मीडिया, बांदा आसेह (इंडोनेशिया)
इंडोनेशियातील जंगलात एका विशिष्ट प्रकारचे लाकूड शोधण्यासाठी गेलेल्या शास्त्रज्ञांच्या टीमला एका झाडावर चार दिवस अन्न पाण्याशिवाय लटकून राहण्याची वेळ आली. या शास्त्रांनांना वाघांच्या टोळीने चारही बाजूंनी घेरलं होतं. त्यांनी मग एका झाडाचा आसरा घेतला, पण वाघाची टोळी काही केल्या तेथून हटण्याचे नाव घेत नव्हती. चार दिवसांनंतर स्थानिक तज्ज्ञांच्या मदतीने या पाच जणांची सुटका करण्यात आली.

इंडोनेशियातील जंगलात एका विशिष्ट प्रकारचे लाकूड शोधण्यासाठी सहा शास्त्रज्ञांची टीम गेली होती. त्यांनी आपल्या भोजनासाठी हरीण पकडण्याचे जाळे टाकले होते. या जाळ्यात वाघाचा एक बछडा फसला आणि चुकीने त्यांनी त्या बछड्याला मारून टाकले. त्यामुळे चिडलेल्या वाघांनी शास्त्रज्ञांवर हल्ला केला. यात एका शास्त्रज्ञाचा मृत्यू झाला. इतर पाच जण आपले प्राण वाचविण्यासाठी झाडावर चढले, पण तब्बल चार दिवस वाघांच्या टोळीने या पाच जणांना चारही बाजूंनी घेरले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चार दिवस हे पाच जण कटू आणि भयानक अनुभवात अन्न पाण्याशिवाय लटकले होते. पोलिसांसह ३० जवांनाची टीम सुमात्रा बेटाच्या उत्तरेला जंगलात पोहचली तेव्हा काही हिंसक वाघ एका झाडाजवळ घिरट्या मारत होते.

बचाव पथकातील एकाही सदस्याची वाघाशी मुकाबला करण्याची हिम्मत नव्हती. तेव्हा त्यांनी वाघांवर नियंत्रण मिळविण्यासाठी तीन स्थानिक तज्ज्ञांना बोलावले. जिल्हा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तीन तज्ज्ञ पुढे गेले आणि त्यांनी काही मंत्र म्हटले, आणि त्यानंतर वाघ तेथून निघून गेले. झाडावरील पाच जण भूक आणि ताहानेने बेहाल होते. पावसाचे पाणी पिऊन त्यांनी दिवस काढले.

# इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

# झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, July 9, 2013, 14:57


comments powered by Disqus