जगातील सर्वात कमी वयाचं जोडपं, १२ व्या वर्षी 'ती' , INT britains youngest parents 12 year old girl a

जगातील सर्वात कमी वयाचं जोडपं, १२ व्या वर्षी 'ती' बनली आई

जगातील सर्वात कमी वयाचं जोडपं, १२ व्या वर्षी 'ती' बनली आई
www.24taas.com, झी मीडिया, लंडन

ब्रिटनमध्ये ही घटना ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसणार आहे. इथं एका अवघ्या १२ वर्षांच्या मुलीनं एका मुलीला जन्म दिलाय... दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे या अर्भकाच्या पित्याचं वय आहे अवघं १३ वर्ष... याचमुळे, हे जोडपं ब्रिटनमधलं सर्वात कमी वयाचं जोडपं बनलंय.

प्रायमरी स्कूलमध्ये सध्या शिकत असलेली कॅली (बदललेलं नाव) वयाच्या ११ व्या वर्षातच गर्भवती झाली होती. १२ व्या वर्षात पदार्पण करताना तीनं एका मुलीला जन्म दिलाय. नवजात बालकाचं वजन सात पाऊंड आहे. म्हणजेच, इतर सर्वसाधारण बालकांसारखंच हे मूल आहे.

या मुलीचा बॉयफ्रेंड नववीत शिकतो. दोघांचीही शाळा वेगळी आहे. या जोडप्याची पहिली भेट ख्रिसमसच्या मुहूर्तावर झाली होती. तेव्हा मुलगी १० वर्षांची तर मुलगा ११ वर्षांचा होता.

एव्हढचं नाही, आणखीन मजेशीर गोष्ट म्हणजे १२ वर्षीय कॅलीची २७ वर्षीय आई ब्रिटनमधील सर्वात कमी वयाची आजी ठरलीय.

संबंधित मुलगा आणि मुलीच्या कुटुंबीयांनी आता हे सत्य स्वीकारलंय. जेव्हा मुलं मोठी होतील तेव्हा दोघांचंही थाटामाटात लग्न लावून देण्याचा निर्णय त्यांनी आता घेतलाय.

महत्त्वाचं म्हणजे, २००६ साली असंच एक प्रकरण समोर आलं होतं. तेव्हा १२ वर्षांची आई बनलेल्या ट्रेसा मिडिलटन हिनं एडिनबर्गमध्ये एका बालकाला जन्म दिला होता. तेव्हा ती सर्वात कमी वयाची आई ठरली होती.

तर, सर्वात कमी वयाचा पित्याचा रेकॉर्ड बेडफोर्डमध्ये राहणाऱ्या सीन स्टीवर्ट याच्या नावानर आहे. १९९८ मध्ये तो वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी बाप बनला होता.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, April 18, 2014, 10:21


comments powered by Disqus