Last Updated: Monday, September 17, 2012, 23:07
www.24taas.com, वॉशिंग्टनइराणच्या एका धार्मिक संघटनेने सलमान रश्दी या वादग्रस्त ब्रिटीश लेखकाची हत्या करण्याठी पुरस्कृत केलेली किंमत ३३ लाख डॉलर्स एवढी वाढवली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, १५ खोरदाद फाउंडेशनने बक्षिस राशींमध्ये ५००,००० डॉलर्सची वाढ केली आहे.
आरआयए एजेंसीच्या माहितीनुसार, अमेरिकेत प्रसारित केलेल्या इस्लाम विरोधी चित्रपट “इनोसेंस ऑफ मुस्लिम” च्या विरूध्द देशभरात विरोधी मोर्चे काढले जात असतानाच बक्षिस राशीत वाढ केली गेली आहे. खरं तर लेखक सलमान रश्दींचा या चित्रपटाशी काहीही संबंध नाही. इराणचे धार्मिक नेते अयातुल्ला रुहोल्ला खुमेनी यांनी १९८९ मध्ये रश्दींच्या कादंबरी “द सॅटनिक वर्सेज” विरोधात त्यांच्या मृत्युदंडाची मागणी केली होती.
मूळचे भारतीय असणाऱ्या ब्रिटीश लेखक रश्दींविरुद्ध इराणी नेत्यांनी फतवा काढला होता. रश्दींच्या कादंबरीचं लेखन इस्लाम धर्मावर हल्ला करणारे आहे असे सांगून रश्दींची मृत्युदंडाची मागणी कायम ठेवली होती. सुरुवातीला रश्दींवर १० लाख डॉलरचे बक्षिस ठेवण्यात आले होते, पण तेव्हापासून ते आतापर्यंत बक्षिसाच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे.
First Published: Monday, September 17, 2012, 23:07