Last Updated: Sunday, August 12, 2012, 12:18
www.24taas.com, तेहरानइराणच्या वायव्य भागाला शनिवारी सायंकाळी भूकंपाचे दोन जोरदार धक्के बसले. या भूकंपामुळे २५० जण ठार, तर २००० जण जखमी झाले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.४ नोंद करण्यात आली आहे.
या भागाला पहिला भूकंपाचा धक्का सहाच्या सुमारास झाला. तर्बिझ शहरापासून ६० किमी अंतरावर अहार आणि हॅरिस या शहरांदरम्यान या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. तर दुसरा धक्का अकरा मिनिटांच्या अंतराने बसला. या भूकंपाची तीव्रता ६.३ इतकी होती.
अहार, हॅरिस आणि वरझाकन या गावांना या भूकंपाचा जोरदार फटका बसला आहे. या भूकंपात सहा गावांमध्ये पूर्णपणे नुकसान झाले आहे. या भूकंपात जखमी झालेल्या नागरिकांना तर्बिझ आणि अर्देबिल या शहरांमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींची संख्या जास्त असल्याने मृतांचा आक़डा वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत १८० जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.
First Published: Sunday, August 12, 2012, 12:18