Last Updated: Tuesday, January 29, 2013, 11:04
www.24taas.com, तेहरान इराणनं स्वदेशी तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं तयार केलेल्या पिशगाम रॉकेटची पडताळणी करण्यासाठी चक्क एक जीवंत माकडालाच अवकाशात धाडलंय.
सोमवारी अधिकृतरित्या जाहीर केलेल्या माहितीनुसार, हे अंतराळ यान एका माकडासहीत अवकाशात झेपावलं आणि त्याचपद्धतीनं सुखरुप खालीही उतरलं. एका न्यूज चॅनलनं दिलेल्या माहितीनुसार, ईरानच्या अंतराळ एजन्सीनं अभ्यास करून या योजनेला पूर्णत्वास नेलंय. पिशगम रॉकेटच्या साहाय्यानं अंतराळ यान ईरानी सुरक्षा मंत्रालयाच्या सुरक्षा विभागाद्वारे पूर्व नियोजित कक्षेत धाडण्यात आलं होतं, असं इराणनं अधिकृतरित्या म्हटलंय.
पण, इराणच्या या अंतराळ यानाच्या अंतराळातील भ्रमणाबद्दल कोणतीही माहीती समोर आलेली नाही. यापूर्वीही एकदा इराणनं माकडाला अंतराळात धाडण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्यावेळी मात्र त्यांना अपयशाला सामोरं जावं लागलं होतं.
First Published: Tuesday, January 29, 2013, 11:04