इराकमध्ये यादवी स्वरुप, तेलसाठे धोक्यात, Iraq crisis: Danger looming on Baghdad as ISIS close

इराकमध्ये यादवी स्वरुप, तेलसाठे धोक्यात

इराकमध्ये यादवी स्वरुप, तेलसाठे धोक्यात
www.24taas.com, झी मीडिया, बगदाद

इराकमध्ये सुरू झालेल्या यादवीनं आणखी गंभीर रूप धारण केलंय. इसिस या अतिरेकी संघटनेच्या फौजा राजधानी बगदादच्या जवळ पोहोचल्या आहेत. तेलसाठ्यांवर हल्ले करण्याची शक्यता आहे.

अतिरेकी राजधानीमध्ये पोहोचल्यास संपूर्ण देशावर त्यांचा कब्जा होण्याची भीती निर्माण झालीये. तसं झाल्यास या देशातले सर्व तेलसाठे अतिरेक्यांचा हातात जाणार आहेत. या हल्ल्यांमुळे लाखो नागरिकांना घरंदारं सोडून पळावं लागलंय.

अमेरिकेसह अनेक देशांनी बगदादमधल्या आपल्या वकिलातींची सुरक्षा वाढवली आहे. दरम्यान, इराकमध्ये अनेक भारतीय असून त्यांची सुरक्षा आपल्या सरकारचं प्राधान्य असल्याचं परराष्ट्र खात्यानं म्हटलंय.

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज परिस्थितीचा आढावा घेतायत. योग्य वेळी योग्य पावलं उचलली जातील, असं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलंय..


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, June 18, 2014, 08:07


comments powered by Disqus