इराकमधील संकट वाढलं, २०० भारतीय फसलेIraq crisis: ISIS militants close in on Baghdad, 200 Indians in

इराकमधील संकट वाढलं, २०० भारतीय फसले

इराकमधील संकट वाढलं, २०० भारतीय फसले
www.24taas.com, वृत्तसंस्था, बगदाद

इराकमधील वाढत्या संकटात जवळपास २०० भारतीय फसलेले आहेत. केरळच्या ५६ नर्सेसनी सोमवारी बगदादमध्ये भारतीय दूतावासासोबत संपर्क करून इथून निघण्याची अपील केली. यापैकी ४४ टिकरित शहरात आणि १२ दहशतवाद्यांनी काबीज केलेल्या परिसरात फसलेल्या आहेत.

१८ हजार भारतीय सध्या इराकमध्ये आहेत. टिकरीतमध्ये फसलेल्या पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या ४१ तरुणांच्या नातेवाईकांनी भारत सरकारला त्यांच्या मुलांना इराकमधून बाहेर काढण्याची विनंती केली. ४० इतर भारतीय मोसुल शहरात फसलेले आहेत जे आतासुद्धा दहशतवाद्यांच्या कब्जात आहे.

५६ नर्सेसनी भारतीय दूतावासातून जाण्याची विनंती केलीय, त्यावर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता सैय्यद अकबरुद्दीन म्हणाले, की नर्सेस सोबत संपर्क साधून त्यांना सुरक्षेबाबत विश्वास देण्यात आलाय. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. इराकमध्ये १८ हजार भारतीयांमध्ये जास्तीतजास्त मजदूर, डॉक्टर आणि नर्स आहेत.

सध्या तिथून निघणं कठीण आहे. टिकरितपासून जवळील विमानतळ म्हणजे बगदाद १८१ किमी आणि एर्बिल २१५ किलोमीटर दूर आहे. रस्ते मार्ग असुरक्षित आहे कारण तिथं हिंसा सुरू आहे. दहशतवादी रस्ते मार्गानींच बगदादकडे पुढे जातायेत. अशात विमान मार्गानं निघणं हा एकच पर्याय उपलब्ध आहे.

टिकरितमध्ये इराकचं सैन्य आणि इस्लामिड स्टेट इन इराक अँड सीरिया (आयएसआयएस)च्या दहशतवाद्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. या शहरावर दहशतवाद्यांनी कब्जा केलाय. टिकरित आणि मोसुल दोन्ही शहरामध्ये सध्या सरकारी एजेंसी सक्रीय नाही. अमेरिकी दूतावासाखाली अमेरिकेसह पश्चिमी देशांनी सोमवारी बगदादहून दूतावास रिकामे करणं सुरू केलंय.
ऑस्ट्रेलियानं सुद्धा दूतावासाची सुरक्षा वाढवलीय. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरीनं सांगितलं, इराकमध्ये दहशतवाद्यांना थांबविण्यासाठी ड्रोन हल्लाच योग्य पर्याय आहे. राष्ट्रपती बराक ओबामा याबाबत विचार करतायेत. दहशतवाद्यांसोबत लढणं आणि लोकशाहीसाठी भारत इराकसोबत आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, June 17, 2014, 17:32


comments powered by Disqus