इराकमध्ये दहशतवादी गटाचा दोन शहरांवर कब्जा, Iraq terrorist group in possession of two cities

इराकमध्ये दहशतवादी गटाचा दोन शहरांवर कब्जा

इराकमध्ये दहशतवादी गटाचा दोन शहरांवर कब्जा
www.24taas.com, झी मीडिया, किरकूक

आखाती युद्धानंतरचा सर्वात मोठा नरसंहार सध्या इराकमध्ये सुरू आहे. इस्लामीक स्टेट ऑफ इराक अँड सिरीया किंवा इसिस या अलकायदाचं समर्थन असलेल्या दहशतवादी गटाने इराकमधल्या तिकरत आणि मुसल या शहरांवर कब्जा केलाय.

या शहरात पकडलेल्या इराकी सैनिकांना गोळ्या घालून एकत्रितरित्या ठार मारल्याचे काही फोटोग्राफ्स दहशतवाद्यांनी प्रसिद्ध केलेत. इराकच्या लष्करी प्रवक्त्यांनी हे फोटो खरे असल्याचं मान्य केलंय. इसिसनं आत्तापर्यंत १७०० इराकी सैनिकांचा नरसंहार केल्याचं म्हटलंय.

दहशतवादी शिया नागरिकांनाही मारत असल्याची माहिती आहे. इसिसनं शहरांवर कब्जा केल्यानंतर आता इराक सरकारनं ही शहरं दहशतवाद्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी कारवाईला सुरूवात केलीय. सौदी अरेबिया ते सिरीया आणि इराणपर्यंत सुन्नी पंथाचं वर्चस्व राहावं अशी या दहशतवादी संघटनेची विचारसरणी आहे.

दरम्यान, अमेरिकेनं या प्रकरणाची गंभीर दखल घेतलीय. इसिसचा निःपात करण्यासाठी अमेरिकेनं युएसएस जॉर्ज डब्ल्यू बुश ही विमानवाहू युद्धनौका इराणच्या आखातात उभी केलीय. इराकी हवाई दलानं आता तिक्रत आणि मुसल शहरं ताब्यात घेण्यासाठी हेलिकॉप्टरद्वारे बॉम्बवर्षाव सुरू केलाय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, June 17, 2014, 11:12


comments powered by Disqus