Last Updated: Thursday, June 19, 2014, 12:21
www.24taas.com, वृत्तसंस्था, वॉशिंग्टनइसिस या अतिरेकी संघटनेचा मुकाबला करण्यासाठी इराक सरकारनं अमेरिकेची मदत मागितली आहे. अमेरिकेनं अतिरेक्यांवर बॉम्बवर्षाव करावा, अशी मागणी इराकी परराष्ट्रमंत्र्यांनी केली आहे.
इराक मधल्या स्थितीबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी एक महत्त्वाची बैठक घेतलीय. इराकमध्ये कोणताही लष्करी कारवाई करण्यासाठी अमेरिकन सरकारला अमेरिकन काँग्रेसची परवानगी घेण्याची गरज नाही असं आज ओबामांनी या बैठकीत सांगितलंय.
दरम्यान अमेरिकेचे उपाध्यक्ष जो बिडन यांनी इराकचे पंतप्रधान नुरी अल मलिकी यांच्याशी फोनवरून बातचीत केलीय. इसिस दहशतवाद्यांच्या या संकटाविरोधात राष्ट्रीय एकतेची गरज त्यांनी व्यक्त केलीय. त्यांनी इसिसचा पाडाव करण्यासाठी आवश्यक असलेल्या लष्करी सिद्धतेबाबतही मलिकी यांच्याशी चर्चा केली.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, June 19, 2014, 12:19