Last Updated: Tuesday, February 19, 2013, 14:18
www.24taas.com, वॉशिंग्टनअमेरिकेत सत्ता बदलाचे वारे जोर धरू लागले आहेत. त्यामुळे अमेरिकेत २०१६च्या निवडणुकीची जोरदार तयारी करण्यात येत आहे. राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू असून भारतीय वंशाचे बॉबी जिंदाल यांना उमेदवारी देण्यात येण्याची शक्यता आहे.
रिपब्लिकन पक्षाकडून अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीची तयारी आतापासून सुरू आहे. सध्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी बराक ओबामा आहेत. त्यांनी सलग दोनदा हे पद भुषविले आहे. त्यामुळे त्यांच्यानंतर अध्यक्ष कोण याची चर्चा सुरू आहे. या चर्चेत भारतीय वंशाचे बॉबी जिंदाल यांचे नाव आघाडीवर आहे. रिपब्लिकन पक्ष त्यांना उमेदवारी देण्यासाठी विचार करत असल्याची चर्चा आहे.
बॉबी जिंदाल यांनी २०१६च्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. जिंदाल यांनी राजकीय बांधणी करण्यावर भर दिलाय. त्यासाठी त्यांनी स्वत:ची प्रतिमा उंचावण्यासाठी आतापासून सुरूवात केलीय. जिंदाल यांची दखल तेथील प्रसारमाध्यमांनी घेतली आहे. त्यामुळे या चर्चेला अधिक धार आलीय.
बॉबी जिंदाल हे लुझियाना राज्याचे गर्व्हनर आहेत. त्यांचा अडीज वर्षांचा कार्यकाल संपत आहे. त्यानंतर ते अधिक सक्रिय होतील, अशी चिन्हे आहेत. कारण जिंदाल यांनी निवडणुकीच्या तयारीवर भर देण्यास सुरूवात केलीय. तर अमेरिकेतील राजकीय निरीक्षकही जिंदाल हे अध्यक्ष निवडणुकीत भाग घेतील, असे भाकित वर्तविले आहे.
First Published: Tuesday, February 19, 2013, 14:17