हृदय बंद पडलं तरी घाबरू नका, जीवंत करणार यंत्र!, Isimo machine is alive even after death the heart

हृदय बंद पडलं तरी घाबरू नका, जीवंत करणार यंत्र!

हृदय बंद पडलं तरी घाबरू नका, जीवंत करणार यंत्र!
www.24taas.com, लंडन

आता मृत्यूवर मात करता येणं आजच्या तंत्राच्या युगात शक्य झालं आहे. हे वाचून तुम्हाला अजब वाटलं ना. मात्र, ही बाब खरी आहे. लंडनमधील डॉक्टरांनी ते शक्य करून दाखवलं आहे. एक्ट्राकॉरपोरियल मेंब्रान ऑक्सीजनरेशन (ईसीएमओ) या मशिनच्या माध्यमातून बंद पडलेलं हृदय पुन्हा कार्यरत करता येतं.

हृदयावर अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांना यश प्राप्त झाले आहे. एक्ट्राकॉरपोरियल मेंब्रान ऑक्सीजनरेशन या मशिनच्या माध्यमातून बंद पडलेलं हृदय पुन्हा सक्रीय करता आलं आहे. हे यश एका मशीनद्वारे शक्य झालंय. त्यामुळे हृदयविकार असणाऱ्यांसाठी हे वरदान ठरलंय. त्यामुळे एखाद्याचं हृहय बंद पडलं तर आता घाबरण्याची भीती नाही. कारण हृदय ईसीएमओ या मशिनद्वारे पुन्हा कार्यरत करणे शक्य होते. तसा दावा लंडनमधील डॉक्टरांनी केलाय.

डेलीमेल या वृत्तपत्राने ईसीएमओ या मशिनबाबत संशोधन करणाऱ्या ब्रिटन येथील निवसी डॉ. सैम पार्निया यांचा हवाला दिला आहे. मात्र, दक्षिण कोरिया आणि जपानमध्ये हे मशीन ७० ते ९० टक्के यशस्वी ठरलंय. बंद पडलेलं हृदय पुन्हा सुरू करण्यात आलंय. अमेरिकेत हे मशीन ४० टक्के प्रकरणात यशस्वी ठरल्याचं पुढं आलंय.

डॉ. सैम पार्निया दाव्यानुसार ७ तासानंतर जपानमधील एका महिलेचे हृदय या मशिनच्यामाध्यमातून सुरू झाले. पार्निया यांनी याला ‘गेम चेंजर’ मशीन म्हटलंय. ते पुढे सांगतात, भविष्यात हार्ट फेलची समस्या या नव्या मशीनमुळे दूर होणार आहे. हार्ट फेलमुळे कोणाचा मृत्यू होणार नाही.

First Published: Wednesday, March 13, 2013, 13:09


comments powered by Disqus