Last Updated: Monday, September 24, 2012, 10:29
www.24taas.com, तेहरानतिसरं महायुद्धाला जबाबदार इस्त्राइलच असेल. जर इस्त्राइलने आमच्या देशावर हल्ला केला, तर तिसरं महायुद्ध भडकेल. असं इराणचे अधिकारी ब्रिगेडियर जनरल आमिर-अली हाजीझादेह म्हणाले. ते वादग्रस्त तेहरान अण्वस्त्र निर्मिती कार्यक्रमाबद्दल बोलत होते.
हाजीझादेह हे एअरोस्पेस डिव्हिजन ऑफ इराणटस इस्लामिक रेव्होलशन गार्ड्स कॉर्प्सचे कमांडर आहेत. प्रेस टीव्हीला मुलाखत देताना हाजीझादेह म्हणाले, की जर इस्त्राइलने इराणवर वार केला, तर तिसरं महायुद्ध सुरू होईल. हे युद्ध रोखणं मग अशक्य होईल.
“हे युद्ध तिसरं महायुद्ध असेल. कारण यात बरेच देश ओढले जातील. कारण इराणच्या विरुद्ध इस्त्राइलला अमेरिका मदत करण्याची दाट शक्यता आहे. अमेरिकेच्या सहाय्याशिवाय इस्त्राइल इराणच्या वाटेला जाणं शक्य नाही.” असं हाजीझादेह म्हणाले. तसंच इराणणधील अमेरिकी बेस हे अमेरिकेचा भाग असल्याचं मानून आम्ही या बेसवर हल्ला करू असा इशाराही हाजीझादेह यांनी केला आहे.
First Published: Monday, September 24, 2012, 10:29