Last Updated: Thursday, January 17, 2013, 13:39
www.24taas.com, जकार्ताइंडोनेशियाच्या सुप्रीम कोर्टात नियुक्त होण्याची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या एका न्यायाधीशाने बलात्कार पीडित महिलांसंदर्भात एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. या त्यांच्या या वक्तव्याने साऱ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यांनी म्हंटले आहे की, पीडित तरूणी ह्या बलात्काराचा आनंद घेऊ शकतात. त्यांच्या या टिप्पणीवर मात्र लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
न्यायाधीश मोहम्मद दामिंग सन्सी यांना काल एका संसदिय समितीच्या समोरच असं आपत्तीजनक, खळबळजनक वक्तव्य केलं. देशाच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती व्हावी यासाठी ते उपस्थित होते. त्यांना विचरण्यात आलं की, बलात्कारासाठी देहदंडाची शिक्षा झाली पाहिजे का? तर त्यावर असं वक्तव्य केलं की ज्याने सारेच अवाक् झाले.
बलात्कारी आणि पीडिताने जर याचा आनंद लुटला असेल तर, अशा गुन्ह्यासाठी देहदंडाविषयी शिक्षा देताना दोनदा विचार करावा, कोणत्याही न्यायाधीशाला शोभणार नाही अशा प्रकारचचं हे वक्तव्य आहे. त्यावर समिती सदस्यांनीही नाराजी व्यक्त केली. त्यानंतर सन्सीने माफी मागितली आणि म्हटलं की, सदस्य निवड करताना जरा जास्त तणाव असतो, आणि तो तवाण कमी होण्यासाठीच मी असं वक्तव्य केलं होतं असंही म्हटंलं
First Published: Thursday, January 17, 2013, 13:19