Last Updated: Tuesday, August 28, 2012, 11:54
www.24taas.com, काबूल काबूलमधील एका रेस्टॉरंटवर दोन महिन्यांपूर्वी चढवलेला हल्ला ताजा असतानाच तालिबान्यांनी रविवारी रात्री ‘उत्सव’ सुरू असलेल्या एका घरात घुसून १७ नागरिकांचा सरळ शिरच्छेद करून टाकला.
तालिबान्यांच्या हिंसाचाराची ही घटना त्यांची हुकूमत चालणार्या हेलमंद प्रांतातील मुसा काला जिल्ह्यात घडली. त्या घरात काही पुरुष आणि महिला एकत्र जमून संगीताच्या तालावर नृत्य करत होते.
कुटुंबातील काही सदस्य नृत्य करीत असताना अचानाक तालिबान्यांनी त्या घरात घुसून जवळजवळ १७ जणांचा जीव घेतला. मात्र त्यामागचे कारण अद्यपही समजेलेले नाह.
First Published: Tuesday, August 28, 2012, 11:51