प्रिन्सेस केटला भारतीय जेवणाचे डोहाळे , Kate Middleton Pregnancy Update

प्रिन्सेस केटला भारतीय जेवणाचे डोहाळे

प्रिन्सेस केटला भारतीय जेवणाचे डोहाळे
www.24taas.com, झी मीडिया, लंडन

इंग्लचा प्रिन्स विल्यम यांची पत्नी प्रेग्नंट आहे. तिचे प्रत्येक लाड पुरविण्यात प्रिन्सरावांचे प्राधान्य आहे. आता तर म्हणे प्रिन्सेस डचेस ऑफ केम्ब्रिज केट मिडलटन हिला भारतीय जेवणाचे डोहाळे लागलेत.

विल्यम यांच्या गर्भवती पत्नी केट मिडलटन यांना भारतीय खाद्यपदार्थांचे डोहाळे लागले आहेत. केट हिने बर्कशायर येथील आपल्या मूळ गावाला भेट दिली. यावेळी केट हिने चान आणि हाश सिंघाडिया या मित्रांकडे चक्क भारतीय खाद्यपदार्थांची मागणी केली.

प्रिन्सेसची ही मागणी तिच्या या मित्रांनी तात्काळ पूर्णही केली. तिला भारतीय पदार्थ खाऊ घातले. त्यानंतर केटने हवे असलेले भारतीय अनेक पदार्थ सोबतही नेले, असे हाशने सांगितले. केटची मागणी पूर्ण झाल्याने प्रिन्सेच्या चेहऱ्यावर हास्य होते. दरम्यान, भारतीय करीमुळे प्रसृती सुलभ होते, असे मानले जाते.

# इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

# झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, July 9, 2013, 15:46


comments powered by Disqus