तब्बल ३१ वर्षांनी राजघराण्याला मिळणार नवा वारसदार!, Kate Middleton pregnant

तब्बल ३१ वर्षांनी राजघराण्याला नवा वारसदार!

तब्बल ३१ वर्षांनी राजघराण्याला नवा वारसदार!
www.24taas.com, लंडन

ब्रिटनचा प्रिन्स विल्यम्स याची पत्नी आणि `डचेस ऑफ केंब्रिंज` केट मिडलटन लवकरच आई होणार आहे. सेंट जेम्स पॅलेसकडून हे गोडगुपित उघड करण्यात आलंय. यामुळे ब्रिटिश शाही परिवाराचा आनंद गगनात मावेनासा झालाय.

‘ड्यूक विल्यम्स आणि डचेस ऑफ केंब्रिज यांना ही बातमी सांगताना आनंद होतोय की डचेस केट मिडलटन या दिवसांत गर्भवती आहेत. त्या सध्या लंडनच्या एका हॉस्पीटलमध्ये आहेत आणि प्रिन्स विल्यम्स त्यांच्यासोबत आहेत’ अशी घोषणाच ब्रिटनमध्ये करण्यात आलीय. १९८१ मध्ये प्रिन्सेस डायना यांनी एका बाळाला जन्म दिला होता. (तोच हा विल्यम्स) त्यानंतर तब्बल ३१ वर्षांनी ब्रिटनमध्ये तोच आनंद पुन्हा एकदा पाहायला मिळतोय.

कॅबिनेट अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, प्रिन्स विल्यम्स यांच्यानंतर या बाळाचाच राजसिंहासनावर अधिकार असेल... मग तो मुलगा असो वा मुलगी.

राजघराण्याच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार केटला सध्या हाइपरमेसिस ग्रेविडेरमचा त्रास होतोय. यामध्ये महिलांच्या पोटात अन्न जास्त वेळ राहत नाही. केट यांना काही दिवस हॉस्पीटलमध्ये ठेवण्यात येणार आहे.

First Published: Tuesday, December 4, 2012, 16:09


comments powered by Disqus