Last Updated: Friday, November 30, 2012, 18:43
www.24taas.com, इस्लामाबादडिओडरंटच्या वादग्रस्त जाहिरातींमधील अश्लीलतेवर सेंसॉर बोर्ड असावं का, याची भारतात चर्चा रंगात असतानाच पाकिस्तानात मात्र भारतीय कलाकारांच्या जाहिरातींना अश्लील ठरवत त्यांच्यावर बंदी घालण्याचा ठराव पाक न्यायालयात घेण्याची शक्यता आहे.
कतरिना कैफच्या ‘हेअर रिमूव्हर’च्या एका प्रसिद्ध जाहिरातीवर अश्लीलतेचा ठपका ठेवत त्यावर पाकिस्तानच्या न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. ही जाहिरात सहकुटुंब पाहाताना लज्जास्पद वाटतं असं खुद्द पाकिस्तानातल्या मुख्य न्यायाधिशांनीही कबूल केलं आहे.
शहारुख खान, कतरिना कैफ, करीना कपूर, शिल्पा शेट्टी इत्यादी अनेक भारतीय कलाकारांच्या जाहिराती पाकिस्तानात दाखवल्या जातात. मलायका आरोरा-खान, गौहर खान आणि इतर बऱ्याच भारतीय मॉडेल्स पाकिस्तानी उत्पादनांच्याही जाहिराती करतात. मात्र आता या सर्वांवरच गंडांतर येण्याची शक्यता निर्माण झाली असून पाकिस्तानातून होणाऱ्या अर्थार्जनाला विराम लागण्याची शक्यता आहे.
First Published: Friday, November 30, 2012, 15:54