लीबियाचे पंतप्रधान अली झिदान यांचं हॉटेलमधून अपहरणLibyan PM Ali Zeidan kidnapped: Report

लिबियाचे पंतप्रधान अली झिदान यांचं हॉटेलमधून अपहरण

लिबियाचे पंतप्रधान अली झिदान यांचं हॉटेलमधून अपहरण
www.24taas.com, वृत्तसंस्था, त्रिपोली

लिबियाचे पंतप्रधान अली झिदान यांचं अपहरण झालंय. मिळालेल्या माहितीनुसार काही अज्ञात शस्त्रधारी लोकांनी त्रिपोलीतील एका हॉटेलमधून पंतप्रधानांचं अपहरण केलं. अली झिदान नुकतेच लिबियाच्या पंतप्रधानपदी निवडले गेले होते.

लिबियाच्या सुरक्षादलांनी दिलेल्या माहितीनुसार, लिबियाची राजधानी त्रिपोलीमधील एका हॉटेलमध्ये पंतप्रधान अली झिदान असतांना आज पहाटे काही सशस्त्र इसम हॉटेलात घुसले आणि शस्त्राच्या धाकावर त्यांनी झिदान यांना जबरदस्तीनं उचलून नेलं. झिदान यांचा शोध अजून लागलेला नाही. अपहरणकर्त्यांकडून सरकारशी कोणताही संपर्क करण्यात आलेला नसल्यानं हे लोक कोणत्या संघटनेचे आहेत, हे कळू शकलेलं नाही.

अल-कायदाचा म्होरक्या अल लिबी याला काही दिवसांपूर्वी त्रिपोलीतून अमेरिकी लष्करानं ताब्यात घेतलं होतं. या पार्श्वभूमीवर लिबियाच्या पंतप्रधानांचं अपहरण ही अत्यंत महत्त्वपूर्ण घटना मानली जात आहे. शिवाय अली झिदान यांचं लिबियाचा माजी हुकूमशहा गड्डाफी यांच्या समर्थकांनी अपहरण केलं असावं असा अंदाजही व्यक्त केला जातोय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, October 10, 2013, 11:20


comments powered by Disqus