Last Updated: Wednesday, September 18, 2013, 19:16
www.24taas.com, झी मीडिया, लंडनगिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने लायगर या १० फुटी मांजरीची जगातील सर्वांत विशाल मांजर म्हणून नोंद केली आहे. ही मांजर वाघिण आणि सिंह यांच्या संकरातून निर्माण झाली आहे. त्यामुळे `लायन` आणि `टायगर` यांच्या संकरामुळे या मांजरीच्या जातीला `लायगर` म्हटलं जातं. लायगरचं वजन ४१८ किलोग्रॅम आहे. तिची उंची १० फूट आहे.
लायगर दिसायला सिंहिणीसारखीच दिसते. मात्र तिचा आकार महाकाय आहे. लायजर दक्षिण कॅरोलिनामधील मायरटल बीच सफारी या अभयारण्यात राहाते. विविध प्रकारच्या मांजरींमध्ये सर्वांत मोठ्या आकाराची मांजर लायगरच आहे. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने या बातमीबद्दल पुष्टी दिली आहे.
सध्याच्या मांजर गटातील सर्वांत मोठी आणि हयात असणारी मांजर लायगर हिच आहे. याआधी लायगर या जनावराला मांजर मानण्यात येत नव्हतं. मात्र आता लायगरला मांजर मानण्यात येऊलागलं आहे. अनेक लायगर सध्या जगात अस्तित्वात आहेत. या मांजरीची लांबी १३१ इंच असते. लायगर जंगलांमध्ये आढळून येत नाही. पाळीव मांजरींपेक्षा लायगरचं वजन १०० पटींनी अधिक असतं. आपल्या आई वडिलांच्या तुलनेत या मांजरीचा आकार दुप्पट असू शकतो.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, September 18, 2013, 18:50