ओबामांच्या शर्टाच्या कॉलरवर लिपस्टिक डाग! Lipstick mark on Obama`s collar

ओबामांच्या शर्टाच्या कॉलरवर लिपस्टिक डाग!

ओबामांच्या शर्टाच्या कॉलरवर लिपस्टिक डाग!
www.24taas.com, वॉशिंग्टन, झी मीडिया

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाइट हाऊसमधील एका कार्यक्रमात आपल्या शर्टाच्या कॉलरला लागलेल्या लिपस्टिकच्या डागावर सफाई दिली. आणि अमेरिकेची प्रथम महिला असणाऱ्या त्यांच्या पत्नी मिशेल यांच्या रागापासून वाचण्यासाठी आपण ही सफाई देत आहोत असंही ते म्हणाले.

सुमारे ३०० लोकांना अभिवादन केल्यानंतर ओबामांनी हसत म्हटलं, “उत्साहाचं अक चिन्ह माझ्या कॉलरवर आहे.” हे लिपस्टिकचं चिन्ह अमेरिकन आयडॉलच्या ११ व्या सीझनमधील दुसऱ्या स्थानावर जिंकलेल्या जेसिका सांचेजच्या एका नातेवाइकाचं असल्याचं बराक ओबामा यांनी स्पष्ट केलं. “ही लिपस्टिकची खूण नक्की कुणाची आहे? जेसिकाची? नाही, तिच्या नात्यातल्या एका महिलेची आहे. ती महिला कुठे आहे?”असं ओबामा हसत म्हणाले.

आपल्या शर्टाच्या कॉलरवर असलेला लिपस्टिकचा डाग ओबामांनी बिनदिक्कत सगळ्यांना दाखवला. त्यानंतर म्हणाले, की या डागामुळे माझ्यात आणि मिशेलमध्ये कुठलंही भांडण होऊ नये, अशी माझी इच्छा आहे. म्हणूनच मी सर्वांसमोर जेसिकाच्या त्या नातलगाला हाक मारत आहे. यावर सर्वजणांनी ओबामांना दिलखुलास दाद दिली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 29, 2013, 15:43


comments powered by Disqus