महिला पत्रकाराने घेतली टीव्हीवर टॉपलेस होऊन मुलाखत!, Lori Welbourne, Journalist, Goes Topless In Interview

महिला पत्रकाराने घेतली टीव्हीवर टॉपलेस होऊन मुलाखत!

महिला पत्रकाराने घेतली टीव्हीवर टॉपलेस होऊन मुलाखत!
www.24taas.com, झी मीडिया, टोरंटो

कॅनडामध्ये जेव्हा मुलाखत घेणाऱ्या पत्रकार लोरी वेलबोर्नने आपला माईक महापौर वॉल्टर ग्रे यांना दिला, तेव्हा महापौरांनी तुम्ही काय करताय? असं तिला विचारलं. पण त्यापुढच्या गोष्टीमुळे मात्र ते हैराण झाले. पत्रकार लोरीने टीव्हीवर मुलाखत घेतानाच आपला हॉल्टर नेक टॉप अंगावरून उतरवला टॉपलेस होऊन पुढील मुलाखत घेतली.

सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या उघड्या स्तनांबद्दल महापौरांची काय प्रतिक्रिया आहे असा प्रश्न विचारत पत्रकार लोरी वेलबोर्नने आपला टॉप काढून आपले स्तन महापौरांना दाखवले. कॅनडामध्ये रस्त्यांवर महिलांनी टॉपलेस फिरणं कायदेशीर आहे. मात्र एका रेस्टॉरंटमध्ये जेव्हा एक महिला उघडी बसली, तेव्हा तेथील मालकाने तिला बेकायदेशीर म्हटले होते. या विषयावर महापौरांना प्रश्न विचारताना मुलाखतकार लोरी आपले कपडे उतरवले आणि अर्धनग्न होत त्यांना पुढील प्रश्न विचारले.

महापौर ग्रे यांनी अत्यंत संयमितपणे तिच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हटलं, की स्त्रियांनी उघडं होणं हे जरी कायद्याला धरून असलं, तरीही त्यांनी सर्वत्र आपले स्तन उघडे ठेवून फिरायलाच हवं असं नाही. महिलांच्या उघडं फिरण्यामुळे अनेक ठिकाणी लोकांचं लक्ष विचलित होतं. मात्र मुलाखतीत लोरीसोबत कॉफी पिण्यास नकार देत मुलाखत संपवत अत्यंत तुटकपणे महापौरांनी काढता पाय घेतला. अशा प्रकारे टीव्हीवर वागणं हे सौजन्यशीलतेला धरून नसल्याचं मानलं जात आहे. लोरी वेलबोर्न ही ऑन दरॉक्स टॉक डॉट कॉमची पत्रकार मुलाखतकार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, August 29, 2013, 19:18


comments powered by Disqus