Last Updated: Wednesday, September 12, 2012, 11:37
www.24taas.com, न्यू यॉर्कपॉप गायिका मॅडोनाने आपल्या पाठीवर अमेरिकन राष्ट्रपती ओबामांच्या नावाचा टॅटू काढून घेतला आहे. न्यूयॉर्कच्या यांकी स्टेडियममध्ये आपल्या एमडीएनए टूरमधील कार्यक्रमादरम्यान मॅडोनाने प्रेक्षकांना हा टॅटू दाखवला.
डेली मेलने प्रकाशित केलेल्या बातमीनुसार, या कार्यक्रमादरम्यान मॅडोनाने टॅटू दिसेल असे कपडे परिधान केले होते. मॅडोना राष्ट्रपती ओबामा यांची समर्थक आहे.
सध्या ओबामांच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी प्रचार सुरू झालेला आहे. आणि आता त्यामुळे मॅडोनाने आपला पाठिंबा जाहिर केल्याने ओबामांच्या निवडणुकीत त्याचा फायदा नक्कीच होणार आहे.
First Published: Wednesday, September 12, 2012, 11:37