चाकू दाखवून न्यूयॉर्कमध्ये माझ्यावरही झाला रेप! - मॅडोना,Madonna reveals that she was raped at knifepoint in New York

चाकू दाखवून न्यूयॉर्कमध्ये माझ्यावरही झाला रेप! - मॅडोना

चाकू दाखवून न्यूयॉर्कमध्ये माझ्यावरही झाला रेप! - मॅडोना
www.24taas.com , वृत्तसंस्था, लॉस अँजेलिस

हॉट आणि सेक्सी पॉप स्टार मॅडोनाने एक गौप्यस्फोट केला आहे. मॅडोनाने सांगितंलय की, पहिल्यांदा जेव्हा ती न्यूयॉर्कला स्टेज शो करायला गेली होती, त्यावेळेस शस्त्राचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता.

`कॉटॅक्टम्यूजिक डॉट कॉम` या वेबसाइटच्या वृत्तानुसार ५५ वर्षीय सेक्सी पॉप स्टारने हा खुलासा महिलांच्या एका मासिकात केला आहे. `हार्पर बाजार` नावाचे हे मासिक असून याच्या नोव्हेंबर मध्ये प्रकाशित होणाऱ्या आवृत्तीत एक लेख मॅडोनाने लिहीला आहे.

मॅडोनाने `ट्रुथ ऑर डेयर` नामक कॉलममध्ये लिहलंय, “न्यू यॉर्क शहर माझ्या कल्पनेनुसार नव्हते. इथे माझ्या वास्तव्याच्या पहिल्या वर्षी मला भयानक वास्तवला सामोरं जावं लागलं. माझ्या पाठीला चाकू लावून मला एका इमारतीच्या छतावर नेण्यात आलं. तेथे माझ्यावर बलात्कार करण्यात आला.”

न्य़ू यॉर्कमध्ये मॅडोनाला इतरही भयंकर अनुभव आले. तीन वेळा माझ्या घराचे कुलूप तोडण्यात आलं. त्यात एकदा तिचा रेडिओही चोरीस गेला. मॅडोनाने लिहिलेल्या अनुभवांमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मॅडोना १९७७ मध्ये न्यूयॉर्कला आली होती. त्या वेळी तिचं १९ वर्षं वय होतं. प्रोफेशनल डांसर होण्यासाठी मॅडोनाने खूप संघर्ष केला आहे. गेल्या ३० वर्षांपासून पॉप गायिकीत मॅडोना वर्चस्व टिकवून आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, October 6, 2013, 14:30


comments powered by Disqus